एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकराजेश्वरी खरातचं धर्मावरुन ट्रोलिंग सुरुच, काहीही शेअर केलं तरी नेटकऱ्यांकडून त्याच कमेंट्स
Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरातला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
By : जयदीप मेढे|Updated at : 16 May 2025 03:55 PM (IST)
Actress Rajeshwari Kharat
Source :
ABPLIVE AIActress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करत आलीये. मात्र, गेल्या काही आठवड्यात तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. राजेश्वरी खरातने (Actress Rajeshwari Kharat) काही दिवसांपूर्वी 'बाप्तिस्मा' हा ख्रिश्चन धर्मातील विधी पूर्ण केला. तेव्हापासून राजेश्वरीला (Actress Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जाव लागतं आहे.
दरम्यान, 'बाप्तिस्मा' हा विधी पूर्ण केला आणि त्याच दिवशी ट्रोलिंग सुरु झाल्यानंतर राजेश्वरी खरातने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. राजेश्वरी खरातने (Actress Rajeshwari Kharat) फेसबुकवर नेटकऱ्यांना प्रत्युत्तर देताना लिहिलं होतं की, मतदानासाठी प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे.........अशी लोक आज मला धर्म/जात शिकवायला आले आहेत. तुमचे स्वागत आहे. कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे. टीप :- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते, असं स्पष्टीकरण राजेश्वरी खरातने दिलं होतं.
मात्र, राजेश्वरी खरातचं ट्रोलिंग अजूनही थांबलेलं नाही. नेटकरी तिने फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिला धर्मावरुन ट्रोल करताना दिसत आहेत. मात्र, राजेश्वरीने ट्रोलिंगला उत्तर देणे टाळले आहे. तिने नुकताच 'एक नंबर तुझी कंबर', या संजू राठोडच्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. राजेश्वरीने तिच्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडीओवर देखील तिला ट्रोल करणाऱ्या कमेंट्स आल्या आहेत.
राजेश्वरी खरातने पूर्ण केलेला बाप्तिस्मा हा विधी काय असतो?
बाप्तिस्मा (Baptism) हा ख्रिश्चन धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. हा विधी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे ख्रिस्ती धर्मात औपचारिक स्वागत होणे. बाप्तिस्माद्वारे व्यक्ती आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध होते, नवीन जीवनाची सुरुवात करते, अशी ख्रिश्चन धर्मात श्रद्धा आहे. बाप्तिस्मा देण्यामागे खालील धार्मिक कारणे आहेत: ख्रिस्ती श्रद्धेनुसार, प्रत्येक मनुष्य मूळ पाप घेऊन जन्मतो. बाप्तिस्मा घेतल्यावर त्या पापातून मुक्ती मिळते. बाप्तिस्मा घेतल्यावर व्यक्ती ख्रिस्तामध्ये नवीन आत्मिक जीवन सुरू करते. हा विधीनंतर संबंधित व्यक्ती ख्रिस्ती समाजाचा एक सदस्य होतो. येशूने स्वतः बाप्तिस्मा घेतला आणि इतरांना ते घेण्याची शिकवण दिली.
बालक बाप्तिस्मा (Infant Baptism): काही संप्रदाय, जसे की कॅथलिक आणि ऑर्थोडॉक्स, लहान मुलांना बाप्तिस्मा देतात. यामागील विचार असा आहे की लहानपणापासूनच पापमुक्त होऊन ख्रिस्ती जीवनाची सुरुवात व्हावी.
प्रौढ बाप्तिस्मा (Believer’s Baptism): बऱ्याच प्रोटेस्टंट संप्रदायांमध्ये व्यक्ती स्वतःच्या इच्छेने आणि श्रद्धेने बाप्तिस्मा घेतो, जेव्हा तो/ती येशूवर विश्वास ठेवायला लागतो.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 15: 'रेड 2' ला इतिहास रचण्यासाठी फक्त 15 कोटींची गरज, या वर्षातील 'छावा' नंतर सर्वाधिक कमाई करणारा ठरेल दुसरा चित्रपट, एकूण कलेक्शन किती?
Published at : 16 May 2025 03:55 PM (IST)
Tags :
Rajeshwari Kharat Marathi News ENTERTAINMENT #Marathi News Actress Rajeshwari Kharat
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion